JOIN Telegram
Sunday , 23 March 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

India Exim बँकेत मिळवा लाखोंच्या पगाराची नोकरी ; कसा अर्ज करायचा ? जाणून घ्या

India Exim Bank Recruitment 2025 : सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारच्या इंडिया एक्झिम बँक (भारतीय निर्यात-आयात बँक) मध्ये विविध पदांसाठी भरती केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया २२ मार्च २०२५ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२५ पर्यंत आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण २८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याआधी उमेदवारांनी भरतीसंबंधीचे सविस्तर तपशील वाचून माहिती घेणं आवश्यक आहे.

उपलब्ध रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

१) मॅनेजर ट्रेनी (डिजिटल टेक्नोलॉजी) – १० पदे: ६० टक्के गुणांसह B.E./B.Tech (कंप्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किंवा MCA आवश्यक आहे.
२) मॅनेजर ट्रेनी (रिसर्च आणि अ‍ॅनालिसिस) – ५ पदे: ६० टक्के गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
३) मॅनेजर ट्रेनी (राजभाषा) – २ पदे: ६० टक्के गुणांसह पदवीधर, हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
४) मॅनेजर ट्रेनी (कायदा) – ५ पदे: ६० टक्के गुणांसह LLB आवश्यक आहे.
५) डेप्युटी मॅनेजर – कायदा (ज्युनियर मॅनेजमेंट I) – ४ पदे: ६० टक्के गुणांसह LLB आणि १ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
६) डेप्युटी मॅनेजर (डिप्युटी कम्प्लायन्स ऑफिसर) (ज्युनियर मॅनेजमेंट I) – १ पद: ICSI चे असोसिएट मेंबरशिप (ACS), ६० टक्के गुणांसह नियमित पदवी, १ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
७) चीफ मॅनेजर (कम्प्लायन्स ऑफिसर) (मिडल मॅनेजमेंट III) – १ पद: ICSI चे असोसिएट मेंबरशिप (ACS), ६० टक्के गुणांसह नियमित पदवी, १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

India Exim Bank Recruitment 2025

वयाची अट: वयोमर्यादा किमान २८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावी. एससी, एसटी उमेदवारांना ५ वर्षांची सूट तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली जाईल.

परीक्षा शुल्क: अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग उमेदवारांसाठी १०० रुपये, तर सामान्य, ओबीसी आणि इतर उमेदवारांसाठी ६०० रुपये शुल्क आहे.

परीक्षेची वेळ: प्रवेश परीक्षा मे २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. परीक्षा चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली येथे घेतली जाईल. उमेदवारांची संख्या कमी झाल्यास परीक्षा केंद्रे बदलू शकतात. मुलाखती फक्त मुंबई आणि नवी दिल्ली येथे घेतल्या जातील.

वेतनश्रेणी: प्रत्येक पदासाठी वेतनश्रेणी वेगवेगळी असली तरी, उमेदवारांना सरासरी ४८,००० रुपये ते १,००,००० रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.

अधिकृत वेबसाईट लिंक: https://www.eximbankindia.in/

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *