India Post Payment Bank Bharti 2025 : तरुणांसाठी मोठी बातमी ; India Post Payment Bank Bharti 2025 इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण पदसंख्या ३४८ इतकी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी २९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

या पदासाठी उमेदवारांकडे भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ, संस्था किंवा बोर्डामधून कोणत्याही शाखेतील स्नातक पदवी असणे आवश्यक आहे. ही पदवी नियमित किंवा दूरस्थ शिक्षण पद्धतीने घेतलेल असू शकते. 1 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्षांदरम्यान अराणे बंधनकारक आहे.
या भरतीत कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांचा स्नातक स्तरावरील गुणांच्या टक्केवारीवरून निवड करण्यात येईल. त्यामुळे गुणपत्रिकेत चांगले गुण मिळवलेल्या उमेदवारांना संधी मिळू शकते. या भरतीसाठी उमेदवारांना 750 शुल्क भरावे लागेल. हे शुल्क एकदा भरल्यानंतर परत मिळणार नाही आणि अर्ज मागे घेता येणार नाही.
उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष नीट तपासावेत आणि कोणत्याही माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर बघावी. ग्रामीण भागातील युवकांसाठी ही सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे.
अर्ज प्रक्रिया – उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट ippbonline.com वर भेट द्यावी. होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर अर्ज फॉर्म भरून सबमिट करावा. फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढून ठेवावा
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati