Indian Navy Recruitment 2025 : भारतीय नौदलाने अग्निवीर एसएसआर आणि अग्निवीर एमआर (बॅच ०२/२०२५ आणि ०२/२०२६) भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. भारतीय नौदलात सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेले आणि पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार २९ मार्चपासून भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अग्निवीर एमआर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून हायस्कूल (१० वी) उत्तीर्ण असावा, तर अग्निवीर एसएसआर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी गणित, भौतिकशास्त्र आणि संगणक विज्ञान/रसायनशास्त्र/जीवशास्त्र या विषयात इंटरमीडिएट उत्तीर्ण असावे.
या भरतीसाठी वयाची अट खालील प्रमाणे आहे: बॅच ०२/२०२५ साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ सप्टेंबर २००४ ते २९ फेब्रुवारी २००८ दरम्यान झालेला असावा. बॅच ०१/२०२६ साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ फेब्रुवारी २००५ ते ३१ जुलै २००८ दरम्यान झालेला असावा. बॅच ०२/२०२६ साठी उमेदवाराचा जन्म १ जुलै २००५ ते ३१ डिसेंबर २००८ दरम्यान झालेला असावा. पात्रता आणि इतर अटींबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना डाउनलोड करू शकतात.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE