वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय नौदलात नाविक पदासाठी भरती सुरू; अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ !

Indian Navy Recruitment 2025 : भारतीय नौदलात वरिष्ठ माध्यमिक (वैद्यकीय) भरती अंतर्गत वैद्यकीय शाखेत नाविक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक, अविवाहित पुरुष उमेदवारांना १० एप्रिल २०२५ पर्यंत https://www.joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Indian Navy Recruitment 2025 news

भारतीय नौदल प्रवेश परीक्षा २०२५ साठी वरिष्ठ माध्यमिक (वैद्यकीय) भरतीच्या ०२/२०२५, ०१/२०२६ आणि ०२/२०२६ बॅचसाठी अर्ज मागवले जात आहेत. उमेदवाराने भारत सरकारच्या मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळापासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह ५०% एकूण गुण आणि प्रत्येक विषयात किमान ४०% गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. तसेच, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बारावी परीक्षा देणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

अधिक माहितीसाठी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे येथे संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे (नि.) यांनी सांगितले आहे.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

BVP COFA पुणे – १६ शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

BVP COFA Recruitment 2026 - Bharati Vidyapeeth, Pune invites Online & Offline applications in prescribed format.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *