वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

AI चिप्स बनवण्यात इंटेल आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा खूप मागे !

AI चिप्स बनवण्यात इंटेल आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा खूप मागे !

Intel to cut 15% of its workforce :

जगातील मोठी चिप उत्पादक कंपनी इंटेलने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा आदेश दिला आहे. कंपनीने म्हटले आहे की, एकूण कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के लोकांना काढण्यात येणार आहे. यामुळे सुमारे 17 हजार 500 कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंटेल कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. विशेषत: कंपनीला चिप्स बनवण्याच्या कामात खूप अडचणी येत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी इंटेल अनेक बदल करत आहे आणि यातील एक बदल म्हणजे कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी.

Intel कंपनीचे का नुकसान होत आहे?
पूर्वी लोक संगणक आणि डेटा सेंटरसाठी अधिकाधिक चिप्स विकत घेत असत, परंतु आता लोक एआई (Artificial intelligence-AI) साठी बनवलेल्या चिप्स खरेदी करत आहेत. AI चिप्स बनवण्यात इंटेल आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा खूप मागे आहे. त्यामुळे कंपनीचे नुकसान होत आहे.

इंटेलच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १ लाखाहून अधिक आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, 29 जूनपर्यंत इंटेलचे कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 16 हजार 500 होती. यामध्ये इंटेलच्या काही सहायक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा डेटा समाविष्ट नाही. इंटेलचे म्हणणे आहे की, या वर्षाच्या अखेरीस पर्यंत हजारो कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी सोडावी लागणार आहे. याचा अर्थ येत्या ५ महिन्यांत बाधित कर्मचाऱ्यांची नोकरी गमवावी लागणार आहे.

ही मोठी बातमी का आहे?इंटेल ही जगातील खूप मोठी कंपनी आहे. या कंपनीतील इतक्या लोकांच्या नोकऱ्या गेल्याने अनेकांच्या जीवनावर परिणाम होईल. तसेच, तंत्रज्ञानाच्या जगात किती वेगाने बदल घडत आहेत हेही या घटनेमधून दिसते. AI मुळे तंत्रज्ञानाला वेग आल्यामुळे मानवी नोकऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

About Majhi Naukri

Check Also

एसआयईएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई अंतर्गत 54 रिक्त पदांची भरती जाहीर !!

SIES College Mumbai Recruitment 2025 SIES College Mumbai Job Recruitment 2025 – SIES College Mumbai …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *