JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IOCL इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी! पगार १ लाखपेक्षा जास्त, जाणून घ्या सविस्तर

IOCL इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी! पगार १ लाखपेक्षा जास्त, जाणून घ्या सविस्तर

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइलने ४६७ नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणारा उमेदवार २१ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतो.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट, इंजिनिअरिंग असिस्टंट, टेक्निकल अटेंडंट अशी विविध ४६७ रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २२ जुलैपासून सुरू झाली आहे, जी २१ ऑगस्ट २०२४ च्या नियोजित अंतिम तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवार IOCL iocl.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

Educational Qualification शैक्षणिक पात्रता:
१० उत्तीर्ण असण्याबरोबर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा डिप्लोमा/ संबंधित क्षेत्रातील पदवी / ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Age Limit वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय २६ वर्षांपेक्षा जास्त नसावे. यात SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना वयात नियमानुसार ५ वर्षांची, तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांती सूट दिली जाईल. ३१ जुलै २०२४ लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Application Fees अर्ज फी : सामान्य, EWS आणि OBC (NCL) श्रेणीतील अर्जदारांना ३०० रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC/ST/PWBD/XSM उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.

Selection Process निवड प्रक्रिया:
१) लेखी परीक्षा
२) कागदपत्रांची पडताळणी
३) वैद्यकीय तपासणी

Salary पगार: उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये ते १ लाख ५ हजार रुपये पगार दिला जाईल.

याशिवाय महागाई भत्ता, भाडे भत्ता, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत.

परीक्षा कधी होणार?
या भरती प्रक्रियेतील संगणक आधारित परीक्षा सप्टेंबर २०२४ मध्ये होणार आहे. परीक्षेचे ई-प्रवेशपत्र १० सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केले जाईल. ऑक्टोबर २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

IOCL Recruitment 2024 साठी ऑनलाई अर्ज कसा भरायचा?

१) सर्वप्रथम IOCL च्या अधिकृत वेबसाईट iocl.com वर जा .

२) होमपेजवर लेटेस्ट जॉब ओपनिंग्सवर जाऊन Click here to Apply Online वर क्लिक करा.

३) एक नवीन पेज ओपन होईल, ज्यात To Register लिंकवर क्लिक करा आणि विचारलेली माहिती भरुन नोंदणी करा.

४) आता Already Registered? To Login वर क्लिक करुन सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

५) शेवटी सर्व फॉर्म नीट भरल्यानंतर शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

६) भविष्यातील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

उमेदवार खालील लिंकच्या आधारे पात्रता, पगार, आरक्षण आणि इतर माहिती जाणून घेऊ शकतात.

अधिकृत वेबसाईटची लिंक https://iocl.com/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *