IRCTC Hospitality Monitors Recruitment 2025 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे . IRCTC भारतीय रेल्वे केटरींग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय रेल्वे केटरींग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड, रेल्वे मंत्रालयाअंतर्गत कार्यरत नवंरत्न सर्वजनिक उपक्रम, यांनी दक्षिण मध्य विभागात हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स या पदांसाठी कराराधारित भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे
या भरतीसाठी पात्र उमेदवारांसाठी वॉल-इन इंटव्ह्यू १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सिकंदराबाद येथे आयोजित करण्यात येणार आहे. अधिकमाहितीसाठी IRCTC PDF जाहिरात डाउनलोड करू शकता. तसेच अधिकृत संकेतस्थळा www.irctc.com वर भेट देऊ शकतात.
पदांची माहिती :
या भरतीद्वारे द्वारे एकूण ४६ पदे भरली जाणार असून, आरक्षण शासनाच्या धोरणानुसार लागू होणार आहे. ही भरती पूर्णतः कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने २ वर्षासाठी असेल, आणि कामगिरी समाधानकारक असल्यास एक वर्षासाठी वाढवली जाऊ शकते.
वेतन किती मिळणार ?
तसे निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३०,००० (ctc) इतके मानधन मिळेल. याशिवाय दैनिक भत्ता (DA): 350/- प्रति दिवस (सेवेच्या कालावधीनुसार), रात्री मुक्काम भत्ता: 240/- (आऊटस्टेशन मुक्काम असल्यास), राष्ट्रीय सुट्टी भत्ता (NHA): 384/- (काम केल्यास) आणि वैद्यकीय विमा: वयाच्या गटानुसार 1,400 ते 2,000 प्रतिमाह मिळेल.
शैक्षणिक पात्रता : बीबीए/एमबीए
वयोमर्यादा : सामान्य प्रवर्ग कमाल वय: 28 वर्षे
नोकरीचे ठिकाण : निवडक निवडकांना आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये नियुक्त केले जाईल. तथापि, IRCTC च्या गरजेनुसार लोकांना भारतातील कोणत्याही ठिकाणी जाऊ शकते.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati