ISRO training program for college students in India : विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबाबत जागरुक करण्याच्या तसेच विद्यार्थ्यांना नवीन संधी देण्याच्या उद्देशाने, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी आंतरवासीयता उपक्रम तसेच प्रकल्प प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे. पदवी, पदव्युत्तर तसेच संशोधन अभ्यासक्रमाच्या देशभरातील विद्यार्थ्यांना या उपक्रमांचा लाभ घेता येणार आहे.
अंतराळ संशोधनाच्या क्षेत्राबाबत अद्यापही विद्यार्थ्यांमध्ये म्हणावी तशी जागृती नाही. या क्षेत्रातील संधींसोबतच यासाठी आवश्यक शिक्षणापासूनही अनेक विद्यार्थी वंचित आहेत. हे लक्षात घेत ‘इस्रो’ मार्फत विविध उपक्रम राबविले जात असून, याचाच भाग म्हणजे हा आंतरवासीयता उपक्रम व प्रकल्प प्रशिक्षण योजना आहे. ‘इस्रो’च्या नॉर्थ इस्टर्न स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरमार्फत या उपक्रमांचे समन्वयने केले जाणार आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
भारतातील कोणत्याही विद्यार्थ्याला यासाठी अर्ज (Indian Space Research Organisation student training) करता येणार असून, इस्रोच्या बेंगळुरू, अहमदाबाद, शिलाँग, हसन, तिरुवनंतपुरम्, डेहराडून, हैदराबाद, महेंद्रगिरी, श्रीहरीकोटा या विविध ठिकाणच्या केंद्रांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक केंद्रासाठी वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागेल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						


