JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीला सुरुवात…

Under the Right to Education Act (RTE), the admission process for 25 percent seats reserved for economically weaker sections in private schools in Pimpri-Chinchwad city is applicable, the registration process of the schools has been started from March 6. After the school registration process is completed, parents will be able to apply. Children’s Moffat and Saktichiya Right to Education Act for the year 2024-2025 or RTE of the financial year. Registration of RTE eligible schools has started for 25% admission process.

In the RTE admission process, special schools have been given the period to register from 6th to 18th March. There are a total of 181 private schools for RTE admission process, 66 in Pimpri division and 115 in Akurdi division. It remains to be seen which of those schools will register for the RTE admission process.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणाऱ्या शाळांची नोंदणी प्रक्रिया ६ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन सुरु केले आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांना ६ ते १८ मार्च या कालावधीत नोंदणी करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पिंपरी विभागात ६६ आणि आकुर्डी विभागात ११५ अशा एकूण १८१ खाजगी शाळा आहेत. त्यापैकी किती शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणार हे पाहावे लागणार आहे.

नोंदणी पूर्ण केल्यानंतरच पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी देखील लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळेस देखील नवीन खासगी शाळांचा तीन वर्षांपर्यत आरटीई प्रवेश प्रक्रिया लगेच समावेश होणार नाही. या शाळांची शैक्षणिक तपासणी आणि पडताळणी पूर्ण केल्यानंतरच त्यांचा समावेश प्रक्रियेत करण्यात येणार आहे.

शाळांनी नोंदणी अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागद पत्रांच्या तपासणीसाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. पडताळणी यशस्वी झाल्यावर प्रवेश घेता येईल. शाळेत कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी होणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

आरटीई प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

निवासी पुराव्यासाठी रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, भाडेकरार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची आवश्यकता आहे. शिक्षण विभागाकडून पत्त्याची पडताळणी करण्यात येईल. जन्म तारखेचा, उत्पन्नाचा पुरावा आणि दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *