JEE Mains Exam 2026 ची नोंदणी सुरु झालेली आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई (मेन ) २०२६ या परीक्षेची अधिसूचना राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA ) जारी केली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ नोव्हेंबर २०२५ आहे. JEE 2026 च्या पहिल्या सत्राची परीक्षा २१ ते ३० जानेवारी दरम्यान होणार आहे. ह्या परीक्षेच्या आधारावर NIT, IIIT आणि IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई-मेन) २०२६ च्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जनोंदणीसाठी २७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून, नोंदणी शनिवारपासून सुरू झाली आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने २०१९ पासून राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडे (एनटीए) या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सोपवली आहे. जेईई (मेन) परीक्षेचे दोन पेपर घेतले जातात. पेपर १ अंतर्गत बी.ई.-बी.टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येतो. या गुणांवरूनच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) आणि इतर केंद्र पुरस्कृत तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेश होतो. तसेच ही परीक्षा जेईई (ॲडव्हान्स) साठी पात्रता ठरते, ज्यावर आधारित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेश दिला जातो. पेपर २ अंतर्गत देशभरातील बी.आर्क आणि बी.प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.
२०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी जेईई (मेन) परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा (सत्र १) जानेवारी २०२६ मध्ये तर दुसरा (सत्र २) एप्रिल २०२६ मध्ये होईल. पहिल्या सत्रातील परीक्षा २१ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्र आणि दिनांकाची माहिती प्रवेशपत्रात दिली जाणार असून, निकाल १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे, असे एनटीएकडून कळविण्यात आले आहे.
जेईई (मेन) – २०२६ पहिल्या सत्राचे वेळापत्रक –
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२५
शुल्क भरण्याची अंतिम तारीख-२७ नोव्हेंबर २०२५ (रात्री ११.५० वाजेपर्यंत)
परीक्षा केंद्राच्या शहराची घोषणा-जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा-पुढील सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार
परीक्षेच्या तारखा-२१ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान
केंद्र, तारीख आणि शिफ्ट-प्रवेशपत्रावर नमूद केल्याप्रमाणे उत्तरपत्रिका आणि उत्तरतालिका प्रसिद्धी-नंतर संकेतस्थळावर जाहीर होणार
अधिकृत संकेतस्थळ – jeemain.nta.nic.in/
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati