फ्रेशर्स साठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. ती म्हणजे अशी मुंबई विद्यापीठात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळावा २२ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे , या मेळाव्यात २५हून अधिक नामांकित कंपन्या १६०० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. विविध क्षेत्रातील नोकरी इच्छुक तरुणांना एकाच ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अधिक माहिती खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवसाय प्रशिक्षण आणि सेवा योजन कक्ष, जिल्हाकौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर (महाराष्ट्र शासन), नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. आणि क्वास्टेक यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ऑगस्ट २०२५ रोजी कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे या मेळाव्याचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठात आयोजित होत असलेल्या या रोजगार मेळाव्यात २५ हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत असून १६०० हून अधिक रोजगाराच्या संधी विविध शैक्षणिक विद्या शाखांतील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या रोजगार मेळाव्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, थॉमस कुक, पेटीएम, शॉपर्स स्टॉप, पँटलून्स, लुपिन लिमिटेड, सुथरलँड यांसारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. माहिती तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, पर्यटन, औषध निर्माण व सेवा क्षेत्रातील विविध संधींचा यात समावेश आहे
हा राज्यस्तरीय उपक्रम सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या मेळाव्याद्वारे नोकरी इच्छुक उमेदवार व विविध क्षेत्रातील नियोक्ते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्योगांना योग्य कौशल्याधारित मनुष्यबळ आणि उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या थेट संधीसाठी या रोजगार मेळाव्याचे महत्व अधोरेखित होणार आहे. कौशल्य विकास केंद्रांमार्फत राज्यभर असे रोजगार मेळावे सातत्याने आयोजित केले जात असून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्वरित निवड केली जाते.
विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध बनविणे व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या व्यापक हेतूने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मुंबई विद्यापीठात करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल (सीटीपीसी ) स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण प्लेसमेंट्स, इंटर्नशिप, उद्योजकता संधी, रोजगार मार्गदर्शन, मॉक इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबविले जातात.
विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरच्या सहकार्याने उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाते तसेच नियमितपणे रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्हस आयोजित केले जातात. या मेगा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ युवक सक्षमीकरण व राष्ट्रीय विकासाच्या दिशेने आपला सहभाग नोंदवित आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati