नोकरीची सुवर्णसंधी तरुणांसाठी उपलब्ध महाराष्ट्रात औद्योगिक प्रगतीचा नवा टप्पा सुरू होत असून नागपूर, चाकण, पनवेल, भिवंडी आणि सिन्नर या पाच प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमध्ये एकाच वेळी 27,510 नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहेत. ही केवळ रोजगाराची बातमी नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या ₹5,127 कोटींच्या थेट परकीय गुंतवणुकीचं स्वागतही आहे.
ब्लॅकस्टोन समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) झाला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारानुसार राज्यात १० हून अधिक आधुनिक लॉजिस्टिक्स व औद्योगिक पार्क्स उभारले जाणार आहेत.
या प्रकल्पांचे वैशिष्ट्य म्हणजे हे पार्क्स पर्यावरणपूरक, डिजिटल सुविधा युक्त असतील आणि शाश्वत रोजगार निर्मितीला चालना देतील. औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ही गुंतवणूक महाराष्ट्राला भारताच्या भविष्यातील लॉजिस्टिक्स हब बनवण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरेल.
एमसीएमसीआरमध्ये सरकारी नोकरीची संधी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्रात (MCMCR) विविध पदांच्या कंत्राटी भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० मे २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेत शैक्षणिक, तांत्रिक, प्रशासकीय आणि कार्यालयीन अशा १५ संवर्गांतील एकूण २० पदांवर नियुक्त्या होणार आहेत. ही भरती कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे.
अर्ज कुठे कराल?
एमसीएमसीआर हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व कौशल्यविकास पुरवणारे एक प्रमुख केंद्र आहे. या संस्थेद्वारे महापालिका आणि इतर नागरी संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढ घडवण्यासाठी संशोधन व सल्लागार सेवा दिल्या जातात.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ:
https://mcmcr.mcgm.gov.in/careers.php
ही सुवर्णसंधी काहीच दिवसांसाठी खुली आहे – त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE