वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सौदी अरेबियात ९१ हजार नोकऱ्या उपलब्ध ; पूर्ण वेळ नोकरी ! जाणून घ्या संपूर्ण माहिती

सौदी अरेबियात अर्धवेळ आणि पूर्ण वेळ नोकरीची संधी आहे. पूर्ण वेळ तब्बल ९१ हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Jobs in Saudi Arabia 2025

सौदी अरेबियात जगाराच्या हजारो नवीन संधींची घोषणा केली आहे. सौदीच्या इस्लामिक व्यवहार, दावा आणि मार्गदर्शन मंत्रालयाने देशातील विविध मशिदींमध्ये तब्बल ३१ हजार नवीन अर्धवेळ नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत. विशेषतः इमाम (नमाजचे नेतृत्व करणारे) आणि मौज्जिन (अजान देणारे) या महत्त्वाच्या पदांसाठी ही मोठ्या प्रमाणावर भरती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश मशिदींमधील सेवांची गुणवत्ता वाढवणे आणि पात्र सौदी नागरिकांना रोजगाराची संधी देणे हा आहे. या नोकऱ्या ‘रिवॉर्ड्स सिस्टीम’ (Makafaat) अंतर्गत येत असल्याने, अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या पदांवर पूर्णवेळ काम करणे बंधनकारक नाही. यामुळे नागरिक आपली मुख्य नोकरी कायम ठेवून, उर्वरित वेळेत मशिदींमध्ये सेवा देऊ शकतील, अशी लवचिक व्यवस्था मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.

या ३१ हजार नवीन जागांसह, मंत्रालयाने ‘राष्ट्रीय रोजगार उपक्रमा’ अंतर्गत एकूण ९१ हजार नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत. या नोकऱ्यांसाठी अर्जदार सौदी नागरिक असावा, त्याचे वय किमान १८ वर्षे असावे आणि त्याचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. इमाम पदासाठी कुराण पठणात आणि मूलभूत इस्लामिक ज्ञानात कौशल्य असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, अर्ज ऑनलाईन पद्धतीने नसून इच्छुकांना मंत्रालयाच्या देशभरातील प्रादेशिक कार्यालयांमध्ये जाऊन थेट अर्ज सादर करावा लागणार आहे

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Gramin Tech Bharti 2026

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड अंतर्गत मुलाखतीचे आयोजन; “या” रिक्त पदांकरिता भरती !!

Gramin Tech Campus Recruitment 2025 Gramin Tech Campus Job Recruitment 2025 – Gramin Technical and …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *