माझी लाडकी बहीण योजनेचा १३ वा हफ्ता म्हणजेच जुलै महिन्याचे पैसे खात्यात जमा होणार. महिलांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. पण हे पैसे फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे. खूप महिलां लाडकी बहीण योजनेच्या बाराव्या हफ्त्यापासून वंचित राहिल्या आहेत. या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
आता येणाऱ्या १३ व्या हफ्त्यात अनेक महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुमचं नाव यादीत आहे का , हे तपासणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता. वेबसाईट वर जाऊन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. मग तुम्हाला यादी दिसेल. या यादीतून तुम्हाला हफ्ता कधी येईल याची माहिती मिळेल.
काही महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हफ्ता जुलै महिन्यात जमा झाला आहे. काही महिला यासाठी अपात्र ठरल्या आहे. आता कोणत्या महिलांना १२ वा आणि १३ वा हफ्ता मिळणार आहे. याची माहिती वेबसाइटवर मिळेल. दोन्ही हफ्ते मिळून महिलांना ३००० रुपये त्यांच्या खात्यात येतील.
लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत दिलेले हप्ते असे आहेत –
पहिला हप्ता मे महिन्यात, दुसरा जूनमध्ये, तिसरा जुलैमध्ये, चौथा ऑगस्टमध्ये, असे करत 12 हप्ते आले आहेत. प्रत्येक हप्त्याची रक्कम 1,500 रुपये आहे. आता तेरावा हप्ता प्रलंबित आहे.
या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही नियम आहेत.
महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. तिचा अर्ज मंजूर झालेला असावा. तिचं वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावं. तसेच, ती पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजना या योजनांचा लाभ घेणारी नसावी.
जर तुम्हाला मागचा हप्ता मिळाला नसेल, तर चिंता करू नका. योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हेल्पलाइन नंबर घ्या. त्या नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवा. लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता लवकरच मिळणार आहे. काही दिवसांत त्याचे वितरण सुरू होईल. त्यामुळे तुम्ही तुमचं नाव यादीत आहे का, हे नक्की तपासा
महिलांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून एक गिफ्ट मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. त्यांची जून महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख जाहीर झालेली आहे. लवकरच खात्यात १५०० रुपये जमा होणार. कदाचित येत्या तीन दिवसात पैसे जमा होतील . लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी पर्यंत जमा होणार ते जाणून घ्या.
नवीन अपडेट समोर आलेले आहे . लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणीनं साठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे त्यांच्या खात्यात या योजनेचा १२ वा हफ्ता कधी पर्यंत जमा होऊ शकतो ? याची महिला फार आतुरतेने वाट बघत आहे. जून महिन्याचा हप्ता अर्थातच बारावा हप्ता 15 ते 20 जून दरम्यान जमा होणार की जुलै महिन्यात याचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात येणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ जमा केला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा लाभ हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आहे. यामुळे याचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय.
आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या 11 महिन्यांचा लाभ जमा करण्यात आला आहे.
महत्वाची बाब अशी की या योजनेचा जून महिन्याचा लाभ म्हणजेच या योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर 15 ते 20 जून दरम्यान या योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होऊ शकतो.
तथापि या संदर्भात अजून सरकारकडून कोणतेच अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरंच या दरम्यान या योजनेचा पैसा मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. खरे तर, मे आणि जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा आणि बारावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात सोबत जमा होणार अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून फक्त मे महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE