महाराष्ट सरकारने कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी एक योजना सुरु केली आहे. ती योजना म्हणजे कंत्राटी कामगार योजना . या योजनेअत्नर्गत कंत्राटी कामगारांना थेट ३० लाखाची आर्थिक मदत मिळणार आहे. महारष्ट्रातील कामगार मोठ्या संख्येने खाजगी कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत असतात. कामगार बांधकाम , सफाई , सुरक्षारक्षक, औद्योगिक कामे अशा अनेक ठिकाणी कार्यरत असतात. त्यांना एक समस्या आहे या कामगारांचा जर अपघात झाला किंवा मृत्यू झाल्यास जबाबदारी कोणीही घेत नाही.
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने २०२५ साली “कंत्राटी कामगार अनुदान योजना ” राबवली असून यामध्ये ३० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. आधी कंत्राटी कामगारांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना काही ना काही आर्थिक मदत मिळायची, पण त्याला ६ महिने इतका वेळ लागायचा. त्यामुळे या काळात कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळायचं.

या कारणाने आता शासनाने या योजनेत काही महत्वाचे बदल केले असून , कामगारांना अनुदान वितरण १५ दिवसातच पूर्ण केले जाईल , असा सरकारचा निर्णय आहे.
या योजनेचा उद्देश
कंत्राटी कामगारांचे जीवन सुरक्षित करणे
अपघातानंतर त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संकटात न पडावं
कामगार वर्गासाठी सामाजिक सुरक्षेची हमी देणे
खाजगी कंपन्यांच्या जबाबदारीला बगल देण्याची प्रवृत्ती थांबवणे
या योजनेसाठी पात्रता
- महाराष्ट्रातील कंत्राटी बेसवर काम करणारे सर्व कामगार
- कोणत्याही खाजगी कंपनी, फॅक्टरी, संस्था किंवा एजन्सीत काम करणारे
- अपघात किंवा मृत्यू कामाच्या ठिकाणी किंवा काम करत असताना झालेला असावा
- अधिकृत कागदपत्रे सादर करणे बंधनकारक (अपघात अहवाल, पोस्टमॉर्टम, वैद्यकीय प्रमाणपत्र, ओळखपत्र इ.)
या योजनेसाठी आवश्यक प्रक्रिया
- अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया
- अपघात घडल्यानंतर संबंधित विभागाला त्वरित माहिती द्या
- अपघाताची चौकशी अहवाल सादर करा
- कामगाराचे कुटुंब सदस्य किंवा प्रतिनिधी यांनी अर्ज सादर करावा
- सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जमा करा
- अर्जाची वैधता तपासून 15 दिवसांत अनुदान दिलं जाईल
कंत्राटी कामगारांसाठी ही योजना जीवनरक्षक ठरणारी आहे. अनेक वेळा अपघात झाल्यानंतर कंपनी जबाबदारी नाकारते आणि कुटुंबीय आर्थिक अडचणीत येतात. पण आता, महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय कंत्राटी कामगारांसाठी दिलासादायक आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati