JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

खुशखबर !! कारागृह विभागाची पोलीस भरती गुणवत्ता यादी जाहीर !

karagruh shipai Bharti Merit list published : महाराष्ट्र राज्यातील कारागृह व सुधारसेवा विभागात शिपाई (पश्चिम विभाग) पदांसाठी 2022-23 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेतील गुणवत्तानुसार पात्र उमेदवारांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. या यादीच्या प्रसिद्धीनंतर मागील दोन वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सदर गुणवत्ता यादीबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास, त्यांनी २३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे हजर राहून आपले आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.

karagurh vibhag shipai bharti result declared

पुणे आस्थापनेवरील या भरती प्रक्रियेत ७७१२ पात्र उमेदवारांनी १०० गुणांच्या लेखी परीक्षेला हजेरी लावली होती. त्यानंतर काही दिवसांत लेखी परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली होती. उमेदवारांकडून आलेल्या आक्षेपांच्या फेरपडताळीनंतर, १५ एप्रिल २०२५ रोजी अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) व शुध्दीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले.

७४७३ उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी आता पोलीस विभागाच्या वेबसाइटवर किंवा मुख्यालयात पाहता येईल. गुणवत्ता यादीवरील गुणांबाबत आक्षेप नोंदवताना उमेदवारांनी स्वतःची OMR उत्तरपत्रिकेची मुळ कार्बन प्रत आणि लेखी परीक्षेचे ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. ही कागदपत्रे न आणल्यास आपले आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *