केंद्रीय विद्यालय लातूर येथे शिक्षकांसाठी भरती !
Kendriya VIdyalay Latur Recruitment 2024 : लातूर येथील केंद्रीय विद्यालय चाकूर येथे भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीतून प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक आणि विशेष शिक्षक या पदांसाठी विविध उमेदवारांची निवड करण्यात येईल. इच्छुक उमेदवार त्यांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे घेऊन २ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये सामील होऊ शकतात. या नोकरीविषयक अधिक तपशील जाणून घेऊ.
लातूर येथील केंद्रीय विद्यालय चाकूर येथे असलेली रिक्त पदे भरण्यासाठी भरती सुरू झाली आहे. त्यासंदर्भातील सूचना प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीमधून प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पूर्व प्राथमिक शिक्षक आणि विशेष शिक्षक यांची नेमणूक करण्यात येतेय. नेमणुकीनंतर ते उमेदवार लातूर येथील चाकूर येथे कार्यरत राहतील.
केंद्रीय विद्यालय चाकूर येथील भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी दिनांक २ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या वॉक इन इंटरव्यूमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. ही मुलाखत घेतल्यानंतर त्या-त्या पदाप्रमाणे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. २ ऑगस्ट २०२४ या दिवशी होणाऱ्या मुलाखत प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर वेळेत हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचे स्थळ: पीएम श्री केंद्रीय विद्यालय, एसटीसी, बीएसएफ, चाकूर, लातूर (महाराष्ट्र) ४१३५१३.
इच्छुक उमेदवारांनी त्यांचा रेझ्यूमे, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत हमी देणारी प्रमाणपत्रे, अनुभवाची हमी देणारी प्रमाणपत्रे यांच्या प्रती आपापल्या अर्जासोबत जोडून आहे तो अर्ज जमा करणे अनिवार्य आहे. हे करण्यासाठी दिनांक २ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख आहे. या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पूर्व प्राथमिक शिक्षक आणि विशेष शिक्षक या तीनही पदांसाठी वॉक इन इंटरव्यूव्ह होणार आहेत. त्यामुळे या पदांवर रुजू होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वरती नमूद केलेल्या स्थळी वेळेवर हजर राहावे.
https://bsfchakur.kvs.ac.in/ चाकूर येथील केंद्रीय विद्यालयात सुरू असलेल्या या भरतीविषयी असेलल्या इतर नियम अटी या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर वाचता येईल. तुम्हाला लातूर येथील केंद्रीय विद्यालय चाकूर येथे घेतल्या जाणाऱ्या इतर उपक्रमांनाविषयी देखील याच संकेतस्थळावरून माहिती घेता येईल.
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

