Ladka Shetkari’ scheme, each farmer will receive financial assistance of ₹6,000 : विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमीन संपादन प्रकरणात झालेल्या अन्यायाला अखेर न्याय मिळाल्याचे समाधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्यांनी जाहीर केले की, 2006 ते 2013 या काळात जे शेतकरी अन्यायग्रस्त ठरले, त्यांना आता त्यांच्या जमिनीच्या पाचपट मोबदल्याची भरपाई मिळणार आहे.
अमरावतीत बोलताना फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी जमीन ही केवळ मालमत्ता नसून ती त्यांच्या जीवनाचा आधार – आईसमान असते. ती हिरावली जाते तेव्हा होणाऱ्या वेदना शब्दात मांडता येत नाहीत. 2006 ते 2013 दरम्यान थेट खरेदी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने प्रतिज्ञापत्र घेतली गेली, त्यांचे हक्क गोठवले गेले आणि त्यांना त्यांच्या जमिनीच्या खऱ्या किमतीपासून वंचित ठेवलं गेलं.”
फडणवीस पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर मी तातडीने निर्णय घेतला आणि नवीन शासन निर्णय (जीआर) काढला. त्यानुसार, शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करताना त्यांना त्यांच्या जमिनीच्या बाजारभावाच्या पाचपट रक्कम भरपाई म्हणून दिली जाईल. तीन वर्षांपूर्वी जी जमीन लाखभर रुपये किंमतीची होती, ती आज १८ लाख रुपयांपर्यंत गेली आहे.” बळीराजा संघर्ष समितीने यासाठी मोठा लढा उभारल्याचंही त्यांनी नमूद केलं. मात्र, नंतर सरकार बदलल्यावर 2006 ते 2013 मध्ये अन्याय करणारेच सत्तेवर परत आले, आणि पुन्हा दुर्लक्ष सुरू झालं. या पार्श्वभूमीवरही संघर्ष सुरू ठेवत, त्यांनी कायदेशीर मार्ग शोधला आणि राज्याच्या महाधिवक्त्यांशी सल्लामसलत करत निर्णयाची अंमलबजावणी केली.
“फक्त कायद्याच्या अभावामुळे अन्याय सहन करणे योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिकवण सांगते की, अन्याय करणारा कायदा बदलला गेला पाहिजे. आमच्या प्रयत्नांतून जेव्हा शेतकऱ्यांना चेक मिळाले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी अनुभवलेला हलकेपणा आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान खूप बोलकं होतं. हीच आमच्या कार्याची खरी पावती आहे,” असेही फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE