Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता या योजनेचा पुढील हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का? तर मग तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयाच्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण नऊ हफ्त्याचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती.
या अंतर्गत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 या नऊ महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. आणि आता एप्रिल 2025 चा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होईल याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच 08 मार्च 2025 रोजी, फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींना एक मोठा गिफ्ट दिला. या दिवशी फडणवीस सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE