Ladki Bahin Yojana Latest Update : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, जी त्या कुटुंबातील महिलांसाठी आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती, आणि आतापर्यंत एकूण 9 हाफ्ते या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण दुसरीकडे, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जाहीर केले होते की, “आम्ही सत्ता आल्यानंतर महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ,” आणि राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापन झाले. तरीही, 2100 रुपयांच्या घोषणेची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात काहीतरी घोषणा होईल अशी आशा होती. महायुतीचे मंत्र्यांनी देखील त्याचे संकेत दिले होते. तथापि, अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. यावर आता अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचा आम्ही विरोध केला नाही, परंतु आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणेचा निर्णय घेऊ. सर्व काही सोंग करता येते, पण पैशांचे सोंग करता येत नाही. आमची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर आम्ही 2100 रुपये देऊ.” त्याचबरोबर, शेतकरी कर्ज माफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन लॉटरी संदर्भात एक समिती गठीत केली जाईल, ज्यामध्ये दोन्ही बाजूंचे सदस्य असतील. अधिवेशन संपायच्या आधी ही समिती गठीत केली जाईल, असेही अजित पवार यांनी सांगितले. तसेच, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 20,000 रुपये मदत देण्याचा निर्णय मागच्या कॅबिनेट बैठकीत घेतला गेला आहे, आणि शासन निर्णय झाल्यानंतर तात्काळ कार्यवाही केली जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितले.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE