माझी लाडकी बहीण योजनेची एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जून चा हफ्ता मिळालेला आहे. पण महिलांना जूनचा हफ्ता मिळाला की नाही हे कसे चेक करायचे ? लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही ? हे जर पाहायचे असेल तर दोन पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन किंवा ऑफलाईन चेक करु शकता. जर ऑनलाईन चेक करायचे असेल तर बँकेच्या अधिकृत ऐप वर जाऊन तुमच्या खात्यातील बॅलेन्स चेक करू शकता. याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
याशिवाय फोन पे सारख्या युपीआय एप्लीकेशनच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्ही मिस कॉल देऊनही तुमच्या खात्यातील बॅलन्स चेक करू शकता.

जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने बॅलन्स चेक करायचा असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या बँक शाखेत जावे लागणार आहे. तुम्ही तुमच्या बँकेत गेल्यानंतर तिथे तुम्हाला पासबुक प्रिंट करून घ्यायचे आहे. पासबुक एन्ट्री केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही याची एन्ट्री दिसणार आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातील अशी घोषणा महायुती सरकारने केली. त्यानंतर लगेचच याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आणि जुलै महिन्यापासून प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळू लागला.
जुलै 2024 पासून या योजनेच्या पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आणि आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना एकूण 12 हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत म्हणजेच ही योजना सुरू होऊन आता बारा महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 2025 या कालावधी मधील एकूण 12 हप्ते मिळाले आहेत.
या योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याच्या हप्त्यासाठी 30 जून 2025 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने 3600 कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास मान्यता दिली आहे. यानुसार 30 जून पासून या योजनेचा बारावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहे. आता जुलै महिन्याचा हफ्ता लवकरच मिळेल .
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati