वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मोठी अपडेट !! लाडकीबहिण योजनेच्या ५२ लाख लाभार्थी महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या नाही;सर्वात मोठं टेन्शन दूर !

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेसंदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. तो म्हणजे केवायसीच्या प्राथमिक छाननीमध्ये 51 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, अशी बातमी समोर आली होती. पण आता अदिती तटकरे यांनी खुलासा केला आहे कि , ५२ लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या नाही आहेत.

Ladki Bahin Yojana November Update 2025

या योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या योजनेसाठी योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या, मात्र आता पात्र नसलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या योजनेसाठी सरकारकडून केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान मध्यंतरी माध्यमांमधून एक बातमी समोर आली होती. ती म्हणजे केवायसीच्या प्राथमिक छाननीमध्ये 51 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, अशी ही बातमी होती, मात्र आदिती तटकरे यांनी या बातमीचं खंडण केलं आहे.

‘काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. “प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र” अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत, या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी e-Kyc प्रक्रिया अजूनही सुरू आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. आदिती तटकरे यांच्या या खुलाशानंतर आता या योजनेसाठी 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या नसल्याचं समोर आलं आहे, यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही एक राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती, या योजनेचा मोठा लाभ महायुतीला झाल्याचं पहायला मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. दरम्यान जर राज्यात पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीत वाढ करू असं अश्वासन देखील त्यावेळी महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं, मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

अर्ज सुरु !! जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) अंतर्गत विविध पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित !!

Jawaharlal Nehru Port Authority Recruitment 2025 JNPA Job Recruitment 2025 – Jawaharlal Nehru Port Authority …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *