Lekha Koshagar Nagpur Exam date announced : कनिष्ठ लेखापाल भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लेखी परीक्षेची तारीख आणि परीक्षा पॅटर्न जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, १७ एप्रिल २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभागाच्या कनिष्ठ लेखापाल भरती संदर्भातील मोठी अपडेट समोर येत आहे. लेखी परीक्षेची तारीख आणि पॅटर्न जाहीर करण्यात आले आहेत. १७ एप्रिल रोजी ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी परीक्षा होण्याच्या एक आठवडा आधी संकेतस्थळावर लिंक सक्रिय केली जाईल. उमेदवार त्याद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करून परीक्षेचा वेळ व ठिकाण याबद्दलची माहिती मिळवू शकतील.
सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभागातील कनिष्ठ लेखापाल रिक्त पदांसाठी ७ जानेवारी २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, संबंधित परीक्षेचे तपशील आणि पॅटर्न असलेले सूचना पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होईल, असे देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
परीक्षेच्या पद्धतीबद्दल, प्रत्येक विभागासाठी दिलेल्या वेळेची पूर्णता झाल्यावर उमेदवारांना पुढील विभागातील प्रश्न सुरू होणार आहेत. तसेच, एक विभाग संपल्यावर उमेदवारांना त्यातील प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा उत्तरांमध्ये बदल करण्याची परवानगी देण्यात जाणार नाही.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE