वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र, गोव्यात डाक विभागात मेगाभरती,३ हजार १७० जागा भरल्या जाणार!

महाराष्ट्र, गोव्यात डाक विभागात मेगाभरती,३ हजार १७० जागा भरल्या जाणार!

Maharashtra and Goa Post Office Recruitment 2024 : महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या या रिक्त जागांपैकी कोणत्या जिल्ह्यात नक्की किती जागा उपलब्ध आहे याबद्दल माहिती घ्या. यामध्ये जिल्हानिहाय रिक्त पदांची यादी देण्यात आली आहे.

भारतीय डाक विभागात महाराष्ट्रात मराठी आणि कोंकणी अशा दोन भाषांसाठी अनेक रिक्त पदांसाठीची भरती सुरू आहे. महाराष्ट्रात ३ हजार ८३ रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे. तर गोव्यात एकूण ८७ रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. यात सहभागी होण्यासाठी ५ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख असेल. कोणत्या जिल्ह्यात किती पदे रिकामी आहेत ही जाणून घेऊ.

जर तुमचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे मराठी किंवा कोंकणी भाषेतून झाले आहे तर विद्यार्थ्यांनो ही नोकरीसाठीची भरती खास तुमच्यासाठीच आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारकडून भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत नोकरीसाठीची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात मराठी आणि कोंकणी अशा दोन भाषांसाठी अनेक रिक्त पदांसाठीची भरती सुरू आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषेतील एकूण ३ हजार ८३ पदांसाठी भरती सुरू आहे. ज्यातील यातील १ हजार ३१८ पदे ही खुल्या वर्गासाठी आहेत आणि इतर १ हजार ७६५ पदे ही विविध वर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. गोव्यात कोंकणी आणि मराठी एकत्रित यासाठी एकूण ८७ रिक्त पदे आहेत. ज्यातील ४७ जागा खुल्या वर्गासाठी आहेत तर ४० जागा या इतर वर्गांसाठी राखीव आहेत. या रिक्त पदांवर रुजू होणाऱ्या उमेदवारांना दर महिना १०,०००/- ते २९,०००/- इतके वेतन दिले जाईल.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात राहणाऱ्या, आपल्या मातृभाषेतून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये सहभाग घेता येईल. नोकरीचे ठिकाण प्रत्येक जिल्ह्यातील पदानुसार त्या त्या ठिकाणी असेल. मराठी किंवा कोंकणी माध्यमातून तुमचे इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण झाले असेल तरच तुम्हाला या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल. विशेष करून इयत्ता दहावी च्या गुणपत्रिकेतले गणित आणि इंग्रजी या दोन विषयांमधले गुण ही प्राधान्याने लक्षात घेतले जातील. त्यानुसारच पुढील फेरीसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.

About Majhi Naukri

Check Also

जया हिंद इंडस्ट्रीज अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदाची भरती – थेट मुलाखती आयोजित !!

Jaya Hind Industries Recruitment 2025 Jaya Hind Industries Job Recruitment 2025 – Jaya Hind Industries …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *