Maharashtra CET Exam 2025 Schedule : महाराष्ट्रात १९ मार्चपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ होणार आहे, आणि या परीक्षा ३ मे पर्यंत चालतील.
राज्यभरातील सुमारे १३ लाख ४३ हजार ४१३ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या CET परीक्षांना सुरुवात होत आहे. १९ मार्च ते ३ मे दरम्यान या परीक्षा घेतल्या जातील. या परीक्षांमध्ये एकूण १९ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, आणि त्या त्या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा प्रशासनाने जाहीर केली आहे. सर्व प्रवेश परीक्षा प्रक्रिया सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आयोजित केली जात आहे.
MHT-CET परीक्षेला एमएड आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या परीक्षेने सुरुवात होईल, तर एमएचटी-सीईटी परीक्षा शेवटी होईल. महाराष्ट्रभरातून जवळपास १३ लाख ४३ हजार विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम, विधी तीन वर्षे व पाच वर्षे या अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया बाकी असली तरी इतर सर्व अभ्यासक्रमांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, बुधवारपासून या परीक्षांना सुरुवात होईल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE