JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मेडिकल प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत ८०० जागा वाढणार

मेडिकल प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत ८०० जागा वाढणार

Maharashtra MBBS admission 2024 : आता ही महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न झाली असून त्यासंबंधीच्या सूचना महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाला देण्यात आल्या आहेत. त्यानंतर सीईटी कक्षाने या महाविद्यालयांची व उपलब्ध जागांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही महाविद्यालये व या ८०० जागा राज्यस्तरीय कोट्यातील तिसऱ्या प्रवेश फेरीत उपलब्ध होतील, असेही सीईटी कक्षाने नमूद केले आहे. तसेच त्यासंबंधीच्या सूचना तिसऱ्या प्रवेश फेरीसोबत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने मान्यता दिलेली राज्यातील आठ नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आता महाराष्ट्र आरोग्यविज्ञान परिषदेशी संलग्न झाली आहेत. त्यामुळे राज्य कोट्यातील तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी तब्बल ८०० जागा वाढणार आहेत. या जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत सीईटी कक्षाने पत्रक काढून महाविद्यालये व जागा यांचे कोष्टक जाहीर केले आहे.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने गडचिरोली, अंबरनाथ, अमरावती, भंडारा, बुलढाणा, हिंगोली, जालना आणि वाशिम या ठिकाणी नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या मान्यतेचा प्रस्ताव राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आरोग्य मंत्रालयाच्या शिफारशीनंतर काही दिवसांपूर्वी परिषदेने या कॉलेजांना मान्यता दिली. मात्र, ही महाविद्यालये नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न नसल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या राज्यनिहाय कोट्यातील दुसऱ्या प्रवेश फेरीत समाविष्ट होऊ शकली नाही.

आता ही महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न झाली असून त्यासंबंधीच्या सूचना महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाला देण्यात आल्या आहेत. त्यानंतर सीईटी कक्षाने या महाविद्यालयांची व उपलब्ध जागांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही महाविद्यालये व या ८०० जागा राज्यस्तरीय कोट्यातील तिसऱ्या प्रवेश फेरीत उपलब्ध होतील, असेही सीईटी कक्षाने नमूद केले आहे. तसेच त्यासंबंधीच्या सूचना तिसऱ्या प्रवेश फेरीसोबत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून सरकार आणि आरोग्य विद्यापीठ यांच्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व ‘एमपीजीआय’ कोणाच्या अखत्यारीत असणार यावरून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्था गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य विद्यापिठाच्या अखत्यारीत आहे. या अंतर्गत विविध संशोधन प्रकल्प राबविण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. तसेच संशोधन हे विद्यापीठाच्या अखत्यारित असल्यास त्याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदाही होणार आहे. परंतु वैद्यकीय पदवी महाविद्यालयासाठीची निधी उभा करणे विद्यापीठाला शक्य नसल्यामुळे हे महाविद्यालय सरकारच्या अखत्यारित ठेवण्याबाबत चर्चा सुरू होती. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जाहीर झल्यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागणार आहेत. नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटलमध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.

Post expires at 1:15pm on Saturday November 9th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *