वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर ! महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत होमगार्ड पदांसाठी ५ टक्के आरक्षण ! त्वरित वाचा संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती अंतर्गत होमगार्ड पदाच्या रिक्त जागेसाठी उमेदवारांना ५ टक्के आरक्षण मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Maharashtra Police Homeguard Bharti 2025

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलात ३८० जागा भरल्या जाणार आहेत. होमगार्ड उमेदवारांना पाच टक्के आरक्षण मिळेल. अर्ज नोंदणी www.nashikruralpolice.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीनंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल. अनेक तरुण खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य पोलिस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गात होत असलेल्या १५ हजार पदांवर घटकनिहाय रिक्त जागांनुसार गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्डमध्ये सेवेत असलेल्या उमेदवारांना पाच टक्के आरक्षण लागू आहे. त्यामुळे सध्या पोलिसांसोबत बंदोबस्त व नाकाबंदीत कर्तव्यावर असलेल्या तरुण होमगार्डस्नी ‘खाकी’ च्या भरतीसाठी कंबर कसली आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलात २१० शिपाई, ५२ चालक, तर कारागृह दलात ११८ शिपाई अशा एकूण ३८० जागांवर भरती होत आहे.

गृह मंत्रालयाने राज्यात १५ हजार रिक्त पदांवर पोलिस भरतीची घोषणा केल्यानंतर सर्व पोलिस घटकांत भरती प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नियमित सराव करणाऱ्यांसह वय ओलांडणाऱ्यांचेही ‘खाकीचे स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. नाशिक शहरात पदे रिक्त नसल्याने तेथील भरती घोषित झालेली नाही. मात्र, ग्रामीण पोलिस दलात होणाऱ्या भरतीमुळे सिंहस्थापूर्वी नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे ‘बळ’ प्राप्त होणार आहे.

सन २०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांत १५०, तर सन २०२४ मध्ये ३२ जागांवर भरती झाली. त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या अर्ज नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून, बारावीपासून विविध विद्याशाखेतील उच्च पदवीधरांनी त्याकरिता तयारी सुरू केली आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Lokmat Akola अंतर्गत “ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह” पदाची भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा !!

Lokmat, Akola Recruitment 2025 Lokmat, Akola Job Recruitment 2025 – Lokmat, Akola invites Online/Offline applications …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *