महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरमध्ये भरती ! मिळेल 1,77,500 रुपये पगार
Maharashtra Remote Sensing Application Center Recruitment 2024 :
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नागपूर येथील महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरमध्ये ‘संसाधन शास्त्रज्ञ’ या रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 05 ऑगस्ट 2024 असणार आहे.
सरकारी नोकरीची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर अंतर्गत ‘संसाधन शास्त्रज्ञ’ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर
रिक्त असलेले पद : संसाधन शास्त्रज्ञ (Resource scientist)
रिक्त पदांची संख्या : 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
कुठे पाठवाल अर्ज?
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440 010 (M.S.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024
नोकरीचे ठिकाण : नागपूर
वयोमर्यादा : 40 वर्षे
शैक्षणिक पात्रता : संसाधन शास्त्रज्ञ : M.E./M.TechB.E./B.Tech
किती मिळणार पगार : 56100 ते 1,77,500 रुपये प्रति महिना
कसा कराल अर्ज?
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर अंतर्गत ‘संसाधन शास्त्रज्ञ’ पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सर्व उमेदवारांनी जाहिरातीत नमूद अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 असणार आहे.