Maharashtra SSC Exam 2026 Shedule declared महाराष्ट्रा १०वी बोर्ड २०२६ ची परीक्षेचे वेळापत्रक SCERT जाहीर केले आहे. दहावीच्या परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहेत. या संदर्भात दिलेली संपूर्ण माहिती नीट वाचून घ्या.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
गेल्या वर्षी वेळापत्रक बदलामुळे टीकेत सापडलेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) यंदा सावध भूमिका घेतली आहे. दहावीच्या परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात, तर पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहेत. मात्र, परीक्षा वेळेत घेऊनही प्रवेश प्रक्रिया वेळेवर पूर्ण न झाल्यास उपयोग काय, असा सवाल शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक आयत्या वेळी बदलल्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) यंदा सावध पवित्रा घेतला आहे. एससीईआरटीने जाहीर केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकात पहिली ते दहावीच्या परीक्षांचा कालावधी आखून दिला आहे. या वेळापत्रकानुसार राज्य माध्यमिक शालांत मंडळाच्या म्हणजेच दहावीच्या परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहेत. तर इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा गेल्या वर्षीप्रमाणेच एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात नियोजित करण्यात आल्या आहेत.
पहिली ते नववीच्या परीक्षांचे नियोजन करण्याचे अधिकार आतापर्यंत प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना होते. त्यामुळे वार्षिक परीक्षेचे नियोजनही मुख्याध्यापक आपापल्या शाळांच्या वेळापत्रकानुसार करत होते. मात्र, यामुळे शैक्षणिक दिवस वाया जात असल्याचे कारण देत एससीईआरटीने गेल्या वर्षी आयत्या वेळी म्हणजेच मार्च महिन्यात राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा तसेच संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजेच पॅटचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत नियोजित होत्या. त्यामुळे शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यासाठी फक्त पाच दिवस हाती होते. या निर्णयावर पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसंस्था या सर्व पातळ्यांवर टीका होऊनही एससीईआरटीने आपला निर्णय पुढे रेटला.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE