JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

‘शिष्यवृत्ती’ची तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध, संकेतस्थळावर १३ मार्चपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

Through the Maharashtra State Examination Council dt. Anuradha Oak, deputy commissioner of the council, informed that the grade-wise and paper-wise interim (provisional) answer list of the pre-higher primary (class 5th) and pre-secondary (class 8) examination held on February 18, 2024 has been announced on the council’s website. The exam answer list has been published on the website www.mscepune.in and https://www.mscepuppss.in. Also, the objections on the interim answer list can be registered online from the council’s website till 13th March 2024.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता ८वी) परीक्षेची इयत्तानिहाय व पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेच्या उपायुक्त अनुराधा ओक यांनी दिली. परीक्षेची उत्तरसूची www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइनरीत्या १३ मार्च २०२४ पर्यंत नोंदविता येणार आहेत.

पालकांसाठी संकेतस्थळावर तर शाळांकरिता त्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन निवदेन नोंदविता येईल. ऑनलाइन निवेदनाशिवाय टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी कोणत्याही प्रकारे नोंदवलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, तसेच मुदतीनंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

ऑनलाइन निवेदनपत्रात दुरुस्तीची संधी

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन निवेदनपत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात विद्याथ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिग आदी दुरुस्ती करण्यासाठी १३ मार्च २०२४ पर्यंत शाळांच्या लॉगिनमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *