महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पगाराच्या बाबतीत नवीन बातमी समोर आलेली आहे. एसआयटी च्या आदेशावरून पगारपत्रकांवर सह्या करीत नसल्याचे कारण यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढे केले होते. शिक्षक – शिक्षकेतर संघटनांनी या प्रकाराला तीव्र विरोध करीत अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. या बाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शिक्षकांच्या पगारपत्रकावर पुढील दोन दिवसांत सह्या करण्याचा निर्णय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगाराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पगारपत्रकावर सह्या न करण्याच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयावरून संतप्त झालेल्या शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत सरकारमार्फत अधिकाऱ्यांच्या संघटनेला बैठकीचे आश्वासन देण्यात आल्यामुळे येत्या दोन दिवसांत अधिकाऱ्यांकडून पगारपत्रकांवर सह्या केल्या जाणार आहेत.
गतवर्षापासून राज्यभरात बोगस मान्यता व बोगस शालार्थ आयडीबाबत ‘एसआयटी’ मार्फत तपासणी सुरू आहे. या तपासणीमध्ये अनेक गैरप्रकार उघडकीस येत असल्यामुळे अजूनही काही महिने ही तपासणी सुरू राहणार आहे. या प्रकरणी अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, अनेकजण निलंबित आहेत. या प्रकारांच्या तपासणीदरम्यान पगारपत्रकावर सह्या केल्यामुळे काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. कोणतीही शहानिशा न करता निरपराध अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाचे म्हणणे होते. पगारपत्रकावर सही केल्यामुळे कारवाई होत असेल, तर आम्ही सहीच करणार नाही, असा निर्णय या संघटनेने घेतला होता डिसेंबर महिन्यात यवतमाळ येथील एका अधिकाऱ्याला याच कारणावरून अटक केल्याने अधिकाऱ्यांनी सह्यांवर बहिष्कार टाकला होता.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati