Maharashtra Tops in English Proficiency, Pune and Mumbai Lead in Employment Opportunities : गेट अहवालातील मोठे खुलासे ; इंग्रजी कौशल्यात महाराष्ट्र अव्वल, रोजगार संधींमध्ये पुणे आणि मुंबई आघाडीवर : ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी टेस्ट अर्थात गेट ही भारत आणि परदेशातील विद्यार्थ्यांचे तसेच व्यावसायिकांचे रोजगारक्षमतेसंदर्भातील कौशल्य तपासणारी एक प्रतिष्ठित चाचणी आहे. ईटीएस व्हीबॉक्स या संस्थेने नुकताच एक सविस्तर कौशल्य अहवाल जाहीर केला असून, यामध्ये विविध राज्यांची आणि शहरांची कामकाजक्षमता स्पष्ट झाली आहे.
इंग्रजीत महाराष्ट्राचा बोलबाला
या अहवालानुसार, इंग्रजी भाषेतील प्रावीण्यामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक दुसऱ्या आणि उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे. ही बाब विशेष लक्षवेधी आहे, कारण आजच्या डिजिटल युगात इंग्रजी हे रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाचे माध्यम बनले आहे.
गणित आणि संगणक कौशल्यात उत्तर प्रदेश अव्वल
उत्तर प्रदेशातील सुमारे ८०% तरुण गणितीय कौशल्ये आणि संगणक प्रवीणतेमध्ये देशात आघाडीवर आहेत. याशिवाय, गंभीर विचारशक्तीच्या (critical thinking) बाबतीतही उत्तर प्रदेशने बाजी मारली असून, त्याच्यामागोमाग राजस्थान आणि मध्य प्रदेश आहेत.
रोजगाराच्या संधींत महाराष्ट्र पुढे
रोजगार उपलब्धतेच्या निकषावर महाराष्ट्र अव्वल असून, येथे ८४% रोजगाराचे प्रमाण नोंदवले गेले आहे. दिल्ली (७८%), कर्नाटक (७५%), आंध्र प्रदेश (७२%), केरळ (७१%), आणि उत्तर प्रदेश (७०%) यांचाही उल्लेखनीय सहभाग आहे.
सर्वाधिक रोजगार देणारी शहरे
पुणे आणि मुंबई या महाराष्ट्रातील शहरांनी देशातील सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या शहरांमध्ये स्थान मिळवलं आहे. याशिवाय, बंगळुरू, दिल्ली, त्रिशूर, हैदराबाद, गुंटूर आणि लखनौ देखील या यादीत आहेत.
तरुणांची वयोगटानुसार प्रगती
१८ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल, तर २६ ते २९ वयोगटात उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे. इंटर्नशिपसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये तामिळनाडू पाठोपाठ उत्तर प्रदेश सर्वाधिक पसंतीचं राज्य ठरत आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE