मित्रांनो, आता जर आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध नोकरी व प्रशिक्षण संधींचा लाभ घ्यायचा असेल, तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह युवकांनी ‘महास्वयम’ पोर्टलवर (rojgar mahaswayam Portal Registration – https://rojgar.mahaswayam.gov.in) नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबत माहिती, प्रशिक्षण अभ्यासक्रम, रोजगार मेळावे आणि इतर योजनांचा लाभ मिळू शकतो. चला तर माहिती बघूया या मोफत नोंदणी आपल्या मोबाईल वरूनच नेमकी कशी करायची.

महास्वयम’ हे एक कुशल व सेमी-कुशल कामगारांना संधी उपलब्ध करून देणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचे एकत्रित व्यासपीठ म्हणजे महास्वयम पोर्टल आहे. युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरीची माहिती मिळावी, प्रशिक्षणासाठी संधी निर्माण व्हावी आणि सक्षम उमेदवार तयार व्हावेत, हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. ‘महास्वयम’वर नोंदणी केलेल्या युवकांना जिल्हा, विभागीय तसेच राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होता येते. यामुळे थेट भरतीसाठी संधी प्राप्त होते. याशिवाय शासनाच्या विविध कौशल्य विकास योजनांसाठी अर्ज करताना याच पोर्टलवरील नोंदणी क्रमांक विचारला जातो. या पोर्टल वर लॉगइननंतर वैयक्तिक प्रोफाइल तयार करा, नोकरी, प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा योजनांसाठी विभागानुसार ब्राउझर करा, पात्रतेनुसार थेट अर्ज करता येतो, शासनमान्य प्रशिक्षण केंद्रांची माहिती व संपर्क उपलब्ध आहे.
👉 या लिंक वरून आपण महास्वयम वर रजिस्टर करू शकता
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, राज्य शासनाच्या कौशल्य प्रशिक्षण योजना, स्वयंरोजगार व महिला बचतगट योजनांसाठी, ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज करतानाही वापर. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत नोंदणी सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सोयीचे ठरणार आहे. या योजनेंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळालेला आहे.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी – नोकरी व प्रशिक्षण संधींचा लाभघेण्यासाठी ‘महास्वयम’वर नोंदणी अनिवार्य, १० वी पास विद्यार्थी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, बेरोजगार युवकांसाठी उपयुक्त, प्रशिक्षण संस्था व रोजगार पुरवठादार यांच्याशी थेट संलग्नता.
रोजगार मेळाव्यांमध्ये सहभाग – पोर्टलवर नोंदणीकृत युवकांना राज्यभरातील रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होता येते, विविध कंपन्या थेट मुलाखती घेतात, उमेदवाराला ऑनलाइनच निवड प्रक्रियेची माहिती दिली जाते.
ऑनलाइन नोंदणी कुठे कराल? – वेबसाइट :www.mahaswayam.gov.in लॉगइन करून ‘Job Seeker’ पर्याय निवडावा, आधार कार्ड, शिक्षणाचे तपशील, ई-मेल, मोबाइल नंबर आवश्यक, नोंदणी पूर्ण केल्यानंतर लॉगइन आयडी व पासवर्ड मिळतो.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati