Mahatransco Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) अंतर्गत विविध पदांच्या २६० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू केली गेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.mahatransco.in/career/active) जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ एप्रिल २०२५ आहे.
स्पर्धा परीक्षा आणि पात्रता:
महापारेषणच्या भरती प्रक्रियेत राज्यभरातील विविध केंद्रांवर १५० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेसाठी वाणिज्य शाखेतील बी.कॉम. पदवी आणि एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या या पदासाठी कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही.
वयोमर्यादा:
या पदासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे असावे. वयोमर्यादेसाठी मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांसाठी शिथिलता दिली जाणार आहे.
अर्ज शुल्क:
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
महापारेषण अंतर्गत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी या सात परिमंडल कार्यालयांमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळावर (http://www.mahatransco.in) भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE