Major Change in Ladki Bahin Yojana; ₹500 Payout for 8 Lakh Women Only : माझी लाडकी बहिण योजनेत मोठा बदल; ७.७४ लाख महिलांचा लाभ कमी, राजकीय वादाला तोंड महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आली आहे.
राज्य सरकारने या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या तब्बल १७ लाखांनी कमी केली असून, आणखी ७.७४ लाख महिलांना मिळणाऱ्या मासिक आर्थिक सहाय्यात कपात केली आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार, या ७.७४ लाख महिलांना याआधी दरमहा ₹१,५०० मदत मिळत होती. मात्र, आता त्यांना फक्त ₹५०० इतकाच लाभ दिला जात आहे. या बदलामागचं कारण स्पष्ट करताना सरकारने सांगितलं आहे की, संबंधित लाभार्थींना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत आधीपासून दरमहा ₹१,००० मिळत आहेत. सरकारच्या धोरणानुसार, ‘लाडकी बहिण’ योजनेतून मिळणाऱ्या एकूण मदतीचा मर्यादा ₹१,५०० प्रति महिना इतकी आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आता केवळ ₹५००
फरकाची रक्कम दिली जात आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केलं की, “धोरणानुसार, ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ अंतर्गत ₹१,००० मिळणाऱ्या ७,७४,१४८ महिलांना लाडकी बहिण योजनेतून ₹५००चा फरक देण्यात येतोय, जेणेकरून त्यांना एकूण ₹१,५०० इतकी रक्कम मिळत राहील.”
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE