Major Changes in the Agniveer Recruitment Process – उमेदवारांना आता १३ भाषांमध्ये परीक्षा देण्याची संधी! या वर्षापासून अग्निवीर भरती प्रक्रियेत काही महत्त्वाचे आणि उमेदवारांना फायदेशीर ठरणारे बदल करण्यात आले आहेत. यापैकी सर्वात मोठा बदल म्हणजे – लेखी परीक्षा आता १३ भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.
आता उमेदवार आपल्याला सोयीस्कर वाटणारी कोणतीही एक भाषा निवडून लेखी परीक्षा देऊ शकतात. या भाषांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड, उर्दू, गुजराती, पंजाबी, उडिया, बंगाली आणि आसामी या भाषा समाविष्ट आहेत.
पूर्वी फक्त दोन भाषांमध्ये परीक्षा देता येत होती, त्यामुळे अनेक उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत असे. ही अडचण ओळखून भारतीय सैन्याने परीक्षा बहुभाषिक करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून प्रत्येक उमेदवार आपल्या मातृभाषेत परीक्षेला सामोरे जाऊ शकेल.
नवीन भरती प्रक्रिया – अधिक सोपी आणि पारदर्शक
या व्यतिरिक्त भरती प्रक्रियेत आणखी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. यावेळी उमेदवारांची शर्यत चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे, ज्यामुळे निवड प्रक्रिया अधिक सुसंगत आणि नियोजनबद्ध होईल.
उमेदवारांना आता एकाच CEE अर्जात दोन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना त्यांना आपले प्राधान्यक्रम निवडावे लागतील.
ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. रॅली दरम्यान बायोमेट्रिक पडताळणी होणार असून, अंगठ्याचा ठसा आणि डोळ्याचा रेटिना स्कॅन केला जाईल.
परीक्षा प्रक्रिया दोन टप्प्यांत
पहिला टप्पा – संगणक आधारित लेखी परीक्षा. ही परीक्षा १०० गुणांची असणार असून, त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे (MCQ) प्रश्न विचारले जातील.
दुसरा टप्पा – भरती मेळावा. यात उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाईल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE