JOIN Telegram
Thursday , 29 May 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे विद्यापीठ अंतर्गत पदवीधारकांसाठी रोजगार मेळावा आयोजित ! जाणून घ्या सविस्तर

पुणे विद्यापीठ अंतर्गत पदवीधर तरुणांसाठी वाणिज्य विभागामार्फत एक रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे . हा रोजगार मेळावा ३  जून २०२५  ला आहे . यासाठी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा .

विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी https://shorturl.at/zDnLU या लिंकवर जाऊन पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.

Mega Job Fair organised in Pune University 2025

पदवीधर तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे! ICA Edu Skills Pvt. Ltd. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने Mega Job Fair 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती मेळा येत्या 3 जून रोजी सकाळी 10 वाजता पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात पार पडणार आहे.

हे जॉब फेअर खासकरून B.Com, M.Com आणि BBA या शाखांतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या उत्तम संधी घेऊन येत आहे. ICA Edu Skills ही संस्था Accounts, Finance आणि Taxation यांसारख्या क्षेत्रांमध्ये कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देते आणि 100% प्लेसमेंट सहाय्य पुरवण्याचे उद्दिष्ट बाळगते.

ICA Edu Skills चे संपूर्ण भारतभर 100 हून अधिक प्रशिक्षण केंद्रे असून, या क्षेत्रातील शिक्षण आणि रोजगार यामधील दरी भरून काढण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. “हा जॉब फेअर केवळ एक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे रोजगारात रूपांतर घडवणारी संधी आहे,” असे ICA तर्फे सांगण्यात आले आहे.

2024 मध्ये आयोजित केलेल्या जॉब फेअरमध्ये 2,900 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 1,500 पेक्षा अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. या कार्यक्रमात 24 कंपन्या सहभागी झाल्या होत्या आणि 250 हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली होती.

तसेच, अशाच नवीन नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट आणि अधिक माहितीसाठी आमच्या majhinaukri.net.in या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *