JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

म्हाडाकडून मुंबईसाठी 2030 घरांसाठी सोडत जाहीर !

म्हाडाकडून मुंबईसाठी 2030 घरांसाठी सोडत जाहीर !

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची उपलब्धता करून दिली जाते.

म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी अखेर सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये 2030 सदनिकांच्या विक्रीची सोडत जाहीर करण्यात आली असून यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी बारा वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे. तर 8 ऑगस्टला राज्यातील विविध वृत्तपत्रात तसेच महाडाच्या वेबसाईटवर https://housing.mhada.gov.in प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पुस्तिका सुद्धा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोणत्या ठिकाणांचा समावेश
मुंबई मंडळामध्ये मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल -वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड इत्यादी गृहनिर्माण प्रकल्पांमधील प्रकल्पांचा समावेश असणार आहे.

अर्ज नोंदणी मुदत
मिळालेल्या माहितीनुसार सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते 9 ऑगस्टला ‘गोल लाईव्ह’ समारंभा द्वारे प्रारंभ केला जाणार आहे. यानंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी बारा वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. तसेच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 4 सप्टेंबर 2024 ला दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. तर ऑनलाईन अनामत रक्कम स्वीकृतीसाठी 4 सप्टेंबर 2024 रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत वेळ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

कधी असेल सोडत
सोडतीसाठी मिळालेल्या अर्जाची प्रारूप यादी दिनांक 9 सप्टेंबर 2024 ला सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. तर प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सोडतीसाठी अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी 11 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत केली जाणार आहे. तर प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाईल.

उत्पन्न गट आणि सदनिका
मुंबई मंडळाच्या 2024 च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी 627 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी 276 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त 370 सदनिका (नवीन व मागील सोडतीतील सदनिका) व मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या 333 सदनिकांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *