JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Ministry of Corporate Affairs मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स मुंबई येथे भरती !

Ministry of Corporate Affairs मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स मुंबई येथे भरती

Ministry of Corporate Affairs Recruitment 2024 :

Ministry of Corporate Affairsमिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स मुंबई येथे ३१ रिक्त पदे आहेत. यंग प्रोफेशनल या पदासाठी असलेली ही रिक्त पदे भरण्यासाठी भरती सुरू आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यासाठी २६ जुलै २०२४ ही शेवटची तारीख असेल. या भरतीतून यंग प्रोफेशनल या पदावर रुजू झाल्यानंतर उमेदवारांना दर महिना ५० हजार इतके वेतन दिले जाईल.

मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स मुंबई येथे भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती यंग प्रोफेशनल साठी खुली आहे. तरुण व्यवसायिकांच्या या रिक्त जागांसाठी उमेदवारांनी अर्ज सादर करावेत यासाठी सूचना जाहीर करण्यात आली आहे. कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाकडून मुंबईत एकूण ३१ रिक्त पदांसाठी भरतीचे घोषणा केली आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स मुंबई मधील भरती मध्ये यंग प्रोफेशनल या पदाच्या ३१ रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरू आहे. या भरतीत निवड झाल्यानंतर त्यांनी एवढ्या उमेदवारांसाठी मुंबई हे नोकरीचे ठिकाण असेल.

यंग प्रोफेशनल पदासाठी वय वर्ष ३५ आणि त्याहून कमी वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. CA, CS किंवा ICWA यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमाचे संपूर्ण शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहे

वरती नमूद केलेल्या अभ्यासक्रमांच्या संपूर्ण अभ्यासासोबतच, तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यासंदर्भातील कामातील एक वर्षाचा अनुभव भरतीतील सहभागी उमेदवाराला असणे अपेक्षित आहे.

इच्छुक उमेदवार ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने ई-मेल करून भरतीतील त्यांचा अर्ज सादर करू शकतात. दिनांक १२ जुलै २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक २६ जुलै २०२४ ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असेल. या तारखेनंतर जमा केलेले अर्ज हे या भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी पत्ता: प्रादेशिक संचालक कार्यालय, पश्चिम क्षेत्र, MCA, मुंबई, 5 वा मजला, “एव्हरेस्ट” इमारत. नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, मरीन ड्राइव्ह, मुंबई ४००००२.

उमेदवाराची निवड होऊन नोकरीवर रुजू झाल्यानंतर दर महिन्याला ५०,०००/- इतके वेतन मिळेल. या भरती मागे मुंबईतील मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स मधील यंग प्रोफेशनल या पदाच्या रिक्त असलेल्या ३१ जागा भरण्याचा उद्देश आहे. हे यंग प्रोफेशनल मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स सोबत कंत्राटी तत्वाने दोन वर्षांसाठी काम करतील. या दोन वर्षातील त्यांचे काम, त्यांचा परफॉर्मन्स हे सर्व लक्षात घेऊन त्यावर आधारित असे त्यांचे कामाचे कंत्राट पुढील दोन वर्षांसाठी वाढणार की नाही हे ठरवले जाईल. यंग प्रोफेशनल हे पद पूर्णवेळ कामाचे पद असून हे काम करत असताना तो उमेदवार इतर ठिकाणचे काम करू शकत नाही.

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *