MPSC महाराष्ट्र्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र्र नागरी सेवा राजपत्रित , गट-अ आणि गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची नवीन जाहिरात प्रकाशित केलेली आहे. या भारतीद्वारे एकूण ८७ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ ते २० जानेवारी २०२६ पर्यंत आहे. अर्ज कधी आणि कसा करायचा ते जाणून घ्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ आणि गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये राज्य सेवा (सामान्य प्रशासन विभाग) आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवाच्या ( महसूल व वन विभाग) अनुक्रमे ७९ आणि ०८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एमपीएससीची २०२६ ची भरती एकूण ८७ रिक्त जागांसाठी होत आहे.
या भरती प्रक्रियेत एकूण ८७ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सेवेतील ७९ आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेतील ८ जागांचा समावेश आहे. अर्जदार ३१ डिसेंबर २०२५ पासून २० जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ऑनलाईनसाठी २० जानेवारी २०२६ असून, एसबीआय चलनद्वारे ऑफलाईन शुल्क २३ जानेवारी २०२६ पर्यंत भरता येईल. या भरतीत खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ आरक्षणाचाही समावेश आहे.
भरती प्रक्रिया –
भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे: पूर्व परीक्षा, लेखी मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षेचे गुण केवळ मुख्य परीक्षेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी वापरले जातील, अंतिम निकालात त्यांचा समावेश नसेल. उप मुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट-अ पदासाठी १३ जागा, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ साठी ३२ जागा, सहायक गट विकास अधिकारी गट-ब साठी ३० जागा, उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब साठी ४ जागा आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ साठी ८ जागा भरल्या जातील.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रतेनुसार, राज्य सेवा परीक्षेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ या पदासाठी वाणिज्य शाखेची पदवी (किमान ५५% गुणांसह), सनदी लेखापाल (CA) अंतिम परीक्षा उत्तीर्ण, परिव्यय लेखाशास्त्र अंतिम परीक्षा उत्तीर्ण, वाणिज्य पदव्युत्तर पदवी किंवा वित्त व्यवसाय प्रशासन (MBA) पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट-ब या पदासाठी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा विज्ञान शाखेची पदवी आवश्यक आहे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षेसाठी, पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ या पदाकरिता पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक पदवी आवश्यक असून, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९७१ नुसार नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati