वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MPSC अंतर्गत गट क पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु ! आजच अर्ज करा

राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुय्यम निरीक्षक, गट- क पदावर (Sub Inspector, Group-C Posts) निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) ही भरती मोहिम राबवली जाणार आहे.

दुय्यम निरीक्षक व लिपिक पदांच्या एकूण १३७ रिक्त जागा (Total 137 vacancies) भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर जाऊन अर्ज भरू शकतात. जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अर्ज प्रक्रिया आज दि. १० जून पासून सुरू करण्यात आली असून त्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ पर्यंत असणार आहे.

MPSC Bharti for Group C Posts 2025

उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. लिपिक संवर्गाअंतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखन, टंकलेखन, लेखापाल व टिप्पणी सहायक ही पदे भरण्याच येणार आहेत. तसेच जवान संवर्गाअंतर्गत जवान, जवान-नि-वाहनचालक, पेटी ऑफिसर, सहायक दुय्यम निरीक्षक ही पदे भरण्यात येणार आहेत.

पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या दोन्ही संवर्गातील उमेदवाराने ३० जून २०२५ रोजी किमान ३ वर्षे सरकारी नियमित सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. असेच उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत. त्याबरोबर महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावी परीक्षा उत्तीर्ण समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षे नियमित सरकारी सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

या व्यतिरिक्त दहावी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांच्या बाबतीत ७ वर्षे नियमित सेवा बजावलेले उमेदवार पात्र आहेत.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NHM 15th FC MNC कोल्हापूर – ७ वैदयकीय अधिकारी पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

NHM MNC Kolhapur MO Recruitment 2026 - Deputy Commissioner, Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *