महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून, सोलापूरच्या विजय लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हिमालय घोरपडे दुसऱ्या आणि रवींद्र भाबड तिसऱ्या क्रमांकावर आहेत. २७ ते २९ मे दरम्यान झालेल्या परीक्षेनंतर १५१६ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. हा निकाल न्यायालयीन निर्णयांच्या अधीन आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असून, हिमालय घोरपडे हे राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. रवींद्र भाबड हे तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि पात्रतागुण जाहीर केले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मेदरम्यान घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या १५१६ उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आल्या. या मुलाखती संपल्यानंतर रात्री अंतिम निकाल जाहीर झाला.
राज्यात प्रथम क्रमांक पटकावणारे विजय लमकणे हे यापूर्वीही एमपीएससीमार्फत विविध सेवांसाठी निवड झालेले अधिकारी असून, सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. या निकालात पुण्याचे समर्थ बालगुडे हे ४२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय बालगुडे यांचे पुत्र आहेत. हा निकाल आरक्षणाच्या समांतर आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांसह विविध न्यायालये व न्यायाधिकरणांमध्ये प्रलंबित असलेल्या न्यायिक प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. सोलापूरचे विजय लमकणे राज्यात प्रथम आले आहेत. हिमालय घोरपडे दुसऱ्या आणि रवींद्र भाबड तिसऱ्या क्रमांकावर आहेत. २७ ते २९ मे दरम्यान परीक्षा झाली होती. १५१६ उमेदवारांच्या मुलाखतीनंतर हा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

