महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मार्फत २०२३ या वर्षी PSI पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे . तरी उमेदवारांनी आपला निकाल खाली दिलेल्या माहिती वरून नीट तपासून बघा .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी घेतलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा पोलीस उपनिरीक्षक (PSI-2023) संवर्गातील ३७४ पदांचा अंतिम निकाल जाहीर केला आहे.
या परीक्षेत सातारा जिल्ह्याच्या आतिष मोरे यांनी खुल्या प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक, बुलढाणा जिल्ह्याच्या चेतन राठोड यांनी मागास प्रवर्गात प्रथम क्रमांक, तर पुणे जिल्ह्याच्या अश्विनी केदारी यांनी महिला प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
निकालासोबतच प्रत्येक प्रवर्गातील शिफारसपात्र शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या निकालाच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांच्या शिफारशी, त्यांनी परीक्षेच्या आवेदनपत्रात केलेल्या दाव्यांच्या आधारे, मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अटींवर आधारित आहेत.
उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास, किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास, संबंधित उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते. तसेच, हा निकाल न्यायप्रक्रियेत प्रलंबित असलेल्या विविध खटल्यांच्या अंतिम निकालाच्या अधीन असून, ही बाब आयोगाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE