MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा रविवारी !
MPSC PSI exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ‘पोलिस उपनिरीक्षक विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३’ रविवार, २९ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच परीक्षा केंद्रांवर १६५६ उमेदवारांची परीक्षा होईल. परीक्षा सकाळी १०:३० ते १२:०० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

उमेदवारांना ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या आणि निळ्या शाईचे बॉल पेन, ओळखपत्र आणि ओळखपत्राची छायाप्रति वगळता अन्य कोणतेही साहित्य किंवा वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही.
उमेदवारांना परीक्षाकक्षात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. तसेच, निर्धारित वेळेनंतर आलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. याबाबतची दक्षता घेतली जावी, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. परीक्षेसाठी २१० अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati