वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MPSC PSI परीक्षेचा निकाल जाहीर झाला !

MPSC PSI परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट -ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालानुसार, उमेदवार शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवाराची यादी , त्यांचे सीट नंबर , कट ऑफ गुण MPSC च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 चा (Joint Main Exam 2024) पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर (PSI post result announced) केला आहे. यंदा या परीक्षेचा कट ऑफ काही प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

MPSC PSI Result announced

ही परीक्षा 29 जून, 2025 रोजी घेण्यात आली होती आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आणि कटऑफ गुणांसह (Merit list of candidates published) निकाल 17 सप्टेंबर, 2025 रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेत दोन पेपर होते आणि शारीरिक चाचणी तसेच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचे वेळापत्रक लवकरच एमपीएससीच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालानुसार, उमेदवार शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची यादी, त्यांचे सीट नंबर आणि कटऑफ गुण एमपीएससीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. शारीरिक चाचणीसाठी निवडलेले उमेदवार पात्रता निकषांच्या पडताळणीच्या अधीन असतील.

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी कट ऑफ गुण वेगवेगळ्या श्रेणी आणि उपश्रेणीनुसार बदलतात. कटऑफ गुण हे ओपन, एससी, एसटी, DT (A), NT (B), SBC, NT (C), NT (D), ओबीसी, EWS, SEBC आणि अनाथ श्रेणींसाठी तसेच प्रत्येक श्रेणीतील जनरल, महिला आणि खेळाडू उपश्रेणीनुसार उपलब्ध आहेत. कटऑफ गुणांची माहिती MPSC च्या वेबसाइटवर तक्त्याच्या स्वरूपात दिली आहे. यामध्ये जनरल मुलांचे कट ऑफ गुण हे 292.50 तर मुलींचे कट ऑफ गुण 275.50 आहेत. तर ओबीस मुलांसाठी 276 आणि मुलींसाठी 255.50 एवढे कट ऑफ गुण आहेत. पुढील तक्त्यात सविस्तर कट ऑफ गुण पाहता येतील.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MPSC Examination 2025

MPSC च्या साडे चारशे जागा रिक्त ! वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) नुकतीच 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५' साठी  जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली आहे. या जाहिरातीत चार संवर्गासाठी एकूण ९३८ पदांची भरती जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, 'सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक' (एएमव्हीआय) (There is no recruitment for AMVI posts) या पदाचा यामध्ये समावेश न झाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांमध्ये सध्या तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *