वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MPSC राज्यसेवा मुख्यपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्या ; या तारखेला होणार परीक्षा !

MPSC Rajyaseva Main Exam has been postponed; the exam will now be held on this date! : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, आता ही परीक्षा 27, 28 आणि 29 मे 2025 रोजी घेतली जाणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुमारे एक महिना अधिक मिळणार आहे.

यापूर्वी ही परीक्षा 26 ते 28 एप्रिलदरम्यान होणार होती. मात्र, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चा सुधारित निकाल जाहीर झाल्यानंतर नव्याने पात्र ठरलेल्या 318 उमेदवारांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नव्हता. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आयोगाकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

MPSC Exam postponed

ही मागणी विशेषतः पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली होती. या पार्श्वभूमीवर आयोगाने उमेदवारांचे निवेदने, आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असामान्य परिस्थिती, तसेच इतर सर्व बाबींचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आयोगाने स्पष्ट केले आहे की वेळापत्रकातील हा बदल अपवादात्मक स्वरूपाचा असून, ही एकवेळचीच बाब आहे.

दरम्यान, राज्यसेवा पूर्व परीक्षेतील गोंधळ, निकालातील विलंब आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे केवळ परीक्षा पुढे ढकलण्यापुरते न थांबता, PSI, STI, ASO, SR या एकत्रित परीक्षांमधील पदसंख्या वाढवण्याचीही विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. या मागण्यांसाठी विविध जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलनही सुरू झाले होते. अखेर, आयोगाने परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करत विद्यार्थ्यांच्या एका प्रमुख मागणीला मान्यता दिली असली, तरी इतर मागण्यांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Fravashi Academy अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर; थेट मुलाखती आयोजित !!

Fravashi Academy Recruitment 2025 Fravashi Academy Job Recruitment 2025 – Fravashi Academy, Nashik invites Offline …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *