वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख आली!

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख आली!

MPSC state service exam 2024 date : कृषि, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे क्र. कृषिआ १०२३/प्र.क्र.२१९/१६-ए, दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा- २०२४ करिता २५८ पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले. सदर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती.

राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 25 ऑगस्ट २०२४ ला राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार होती. पण त्याचदिवशी IBPS ची परीक्षा आल्याने पुढे

MPSC Exam Date 2024

ढकलावी लागली होती. तसेच २०२४ च्या जाहिरातीमध्ये कृषीसेवेच्या जागाही समाविष्ठ कराव्यात अशीही मागणी परीक्षार्थींनी केली होती. त्यावेळी परीक्षेच्या काही दिवस अगोदर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून परीक्षा रद्द केली होती. आता जवळपास एक महिन्यानंतर आज MPSC ने परिपत्रक काढून महत्त्वाची माहिती दिली आहे. यामध्ये राज्यसेवा परीक्षेतूनच कृषीच्या जागा भरल्या जाणार आहेत असे स्पष्ट केले आहे आणि त्या परीक्षेची तारीखही दिली आहे.

आगामी निवडणुकांचा विचार करून राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा १ डिसेंबर रोजी आयोजित करणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. आयोगाने परिपत्रकात माहिती दिल्याप्रमाणे कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच ही परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले आहे.

परिपत्रकातील माहितीनुसार, “महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मध्ये कृषिसेवेतील पदांचा समावेश करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी विविध संवर्गाच्या एकूण २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण ५२४ पदांचे शुद्धिपत्रक दिनांक ८ मे, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.

कृषि सेवेतील पदांचा समावेश
“सदर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषि, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे क्र. कृषिआ १०२३/प्र.क्र.२१९/१६-ए, दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा- २०२४ करिता २५८ पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले. सदर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती. सदर विषयासंदर्भात मा. आयोगाची दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये करण्यात येत आहे.”

राज्यसेवा पूर्व परीक्षा १ डिसेंबरला-
कृषि सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. कृषि सेवेसंदर्भात शुद्धिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात येईल. सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी तसेच ऑक्टोबर, २०२४ मध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरतीप्रक्रिये संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी विधानसभा निवडणुकीची आचार संहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ चे आयोजन सुधारित तारखेस म्हणजेच दिनांक ०१ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात येईल.

 

About Majhi Naukri

Check Also

ICT मुंबई – प्रकल्प सहाय्यक पदावर नोकरीची संधी

ICT Mumbai RGSTC PA Job 2026 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *