MPSC विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! वयोमर्यादेत वाढ !
MPSC Student Age Limit : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासकीय सेवेत विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता दिली आहे. यामुळे महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना आता अर्ज करण्याची एक नवी संधी मिळणार आहे.
शुक्रवारी राज्य सरकारने राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) शासकीय सेवेत विविध पदांच्या भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली, ज्यामुळे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नोकरीसाठी अपात्र ठरलेल्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाची शिथिलता: ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ज्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत, त्या सर्वांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आरक्षण अधिनियम-२०२४ अन्वये शासकीय सेवेत नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. या अधिनियमानुसार जाहिरातींमध्ये थोडा विलंब झाला होता, त्यामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादा ओलांडल्याने परीक्षा प्रक्रियेत भाग घेऊ शकत होते.
कोणाला मिळणार फायदा? १ जानेवारी २०२४ पासून जोपर्यंत नवीन जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत आणि त्यातील निवड प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही, अशा जाहिरातींमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादेतील शिथिलता मिळणार आहे.
तसेच, ज्या पदांसाठी २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयानुसार वेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती, त्या पदांसाठी देखील शिथिलता देण्यात येणार आहे. यामुळे अशा पदांसाठी अर्ज करणारे उमेदवारही अर्ज करण्यासाठी पात्र ठरतील.
MPSC ने या शिथिलतेची कार्यवाही करण्यासाठी योग्य प्रक्रिया सुरू केली आहे, आणि अर्ज सादर करण्याची एक संधी उमेदवारांना दिली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE