MPSC’s planning is weak! – एमपीएससीचे नियोजन ढिसाळ; विद्यार्थ्यांची चिंता वाढली महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ने २०२५ च्या तात्पुरत्या वेळापत्रकात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये येईल, अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र, मार्च महिना उलटूनही या जाहिरातीचा ठोस निर्णय न घेतल्यामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
एमपीएससीने यंदा २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, राज्यभरातील लाखो विद्यार्थी मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या विविध शहरांमध्ये या नव्या पद्धतीनुसार तयारी करत आहेत. आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार, राज्यसेवेची जाहिरात जानेवारी महिन्यात अपेक्षित होती. त्यामुळे, मागील दोन महिन्यांपासून विद्यार्थी या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत आहेत. तथापि, आयोगाच्या नियोजनातील ढिसाळपणामुळे विद्यार्थ्यांना नुकसान होऊ लागले आहे.
अशा परिस्थितीत, मागील काही महिन्यांपासून एमपीएससीच्या अनेक परीक्षांचे निकाल आणि मुलाखती रखडल्याबद्दल उमेदवारांनी तक्रारी केली आहेत. आता राज्यसेवेच्या जाहिरातीचेही विलंब होत असल्याने, आयोग कुठला “ब्रह्ममुहूर्त” शोधत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE