राज्यात होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने (एमएसबीटीई-MSBTE) पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांच्या (polytechnic written exams)वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या १ व २ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा आता ४ आणि ५ डिसेंबर रोजी घेतल्या जाणार आहेत.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर निवडणुकांसाठी शैक्षणिक संस्थांच्या इमारती व वर्ग खोल्या सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. निवडणुकीच्या आधी एक दिवस, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आणि मतदानानंतर पुढे एक दिवस या कालावधीत परीक्षा घेणे शक्य नाही.मात्र, यापूर्वीच पॉलिटेक्निकची परीक्षा १ आणि २ डिसेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.परंतु, निवडणुकांमुळे या परीक्षा आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बदलेल्या वेळापत्रकानुसार येत्या १ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा आता ४ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. तर तर २ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा ५ डिसेंबर रोजी आयोजित केली जाईल. परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाची माहिती संबंधित विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी प्राचार्य यांची राहिल,असे एमएसबीटीईचे सचिव उमेश नागदेवे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati